राष्ट्रीय कीर्तनकार श्री चारुदत्त गोविंदस्वामी आफळे
परिचय
शैक्षणिक
मराठी विषय घेऊन B.A. तसेच संगीत विषय घेऊन M.A. पदवी प्राप्त केली. यासाठी पं. शरद गोखले, पं. पद्माकर कुलकर्णी, मुकुन्द्बुवा गोखले, आगाशेबुवा, मधुकर खाडिलकर, पं. विजय बक्षी यांचे मार्गदर्शन लाभले.
संगीत नाट्यसेवा
शालेय वयापासून त्यांनी संगीत नाटकांतून विविध भूमिका केल्या.
सादर केलेली नाटके | भूमिका | |
शाकुंतल | राजा दुष्यंत | |
सौभद्र | कधी नारद/कधी अर्जुन/कधी कृष्ण | |
संशयकल्लोळ | अश्विन शेट | |
मानापमान | धैर्यधर | |
कान्होपात्रा | संत चोखामेळा | |
विद्याहरण | देवगुरु कच | |
मत्स्यगंधा | पराशर | |
लावणी भुलली अभंगाला | संत निळोबाराय | |
आतून कीर्तन वरून तमाशा | हरिदासबुवा | |
ईथे ओशाळला मृत्यू | संताजी | |
तो मी नव्हेच | गायक बुवा |
कट्यार काळजात घुसली या नाटकात बालपणी छोटा सदाशिव, महाविद्यालयीन काळात खा साहेबांचा शागीर्द चांद, पुढील काळात या नाटकाचा नायक सदाशिव आणि आता या नाटकाचा कळस अशी खा साहेबांची भूमिका आता ते करतात. जी भूमिका पूर्वी पंडित वसंतराव देशपांडे यांनी गाजविलेली होती.
रंग शारदा प्रतिष्ठानच्या स्वर सम्राज्ञी नाटकात गंगाधर बुवांची भूमिका त्यांनी विजय गोखले यांच्या बरोबर केली. तसेच नागपूर नजीक झोपडपट्टी मध्ये कितीतरी विविध नाटकात विविध भूमिका केल्या. किर्ती शिलेदार यांच्या नाटक कंपनी मध्ये ऑर्गन ची साथ सुद्धा त्यांनी केली.
नाट्यसंगीताची वाटचाल
1> वैभव नाट्य संगीत, 2> एक बैठक एक नाटक
असे अभ्यासपूर्ण कार्यक्रम ते सदर करतात. त्यामध्ये मोलाची ऑर्गन साथ श्री. राजीव परांजपे करतात. नाट्य संगीताच्या सादरीकरणासाठी राजीव परांजपे यांचे मार्गदर्शन श्री. आफळे यांना लाभले आहे. सन 2000 मध्ये मास्टर दिनानाथ मंगेशकर जन्मशताब्दी निमित्ताने मंगेशाकारांनीच गाजवलेली रणदुंदुभी हे नाटक भारत नाट्य संशोधन मंदिराने सादर केले. त्यात मंगेशकरांनी साकारलेली तेजस्विनी ची स्त्री भूमिका आफळे यांनी साकारली होती.
असे अभ्यासपूर्ण कार्यक्रम ते सदर करतात. त्यामध्ये मोलाची ऑर्गन साथ श्री. राजीव परांजपे करतात. नाट्य संगीताच्या सादरीकरणासाठी राजीव परांजपे यांचे मार्गदर्शन श्री. आफळे यांना लाभले आहे. सन 2000 मध्ये मास्टर दिनानाथ मंगेशकर जन्मशताब्दी निमित्ताने मंगेशाकारांनीच गाजवलेली रणदुंदुभी हे नाटक भारत नाट्य संशोधन मंदिराने सादर केले. त्यात मंगेशकरांनी साकारलेली तेजस्विनी ची स्त्री भूमिका आफळे यांनी साकारली होती.
या नाट्यसेवेसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले.
पुणे मराठी ग्रंथालयाचा | पाटणकर पुरस्कार | |
गोवा माशेल संघाकडून | सुवर्ण पदक | |
अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून | पलुस्कर पुरस्कार | |
सन 2002 मध्ये | पुणे की आशा पुरस्कार |
कीर्तन
आफळे घराण्याचा मूळ वसा कीर्तन यातही बुवांचे नाव आघाडीचे कीर्तनकार म्हणून आहे. आफळे घराणे मूळ क्षेत्र माहुलीचे, सज्जनगड पायथ्याचे. समर्थांचे काळापासून या घरात कीर्तन सेवेचे व्रत आहे. ते व्रत बुवा निष्ठेने पार पाडित आहेत. ते आकाशवाणी पुणे चे मान्यताप्राप्त कलाकार आहेत.
1988 ते 2012 ह्या 24 वर्षात त्यांनी 4000च्या वर कीर्तने सादर केली आहेत. महाराष्ट्र, गुजरात, बंगाल, कर्नाटक, दिल्ली सर्वत्र कीर्तन होत असतात. कीर्तनासाठी दोन वेळा अमेरिका एकदा कॅनडा, दुबई, कुवेत तर एकदा ऑस्ट्रेलिया दौराही त्यांनी केला आहे. अनेकांना आफळे कीर्तन प्रशिक्षण देतात व अनेक कीर्तन विद्यालयातून अध्यापनाचे कार्यही करतात. कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाकडून कीर्तन विद्यालयांच्या परिक्षांचे परीक्षक म्हणूनही कार्य करतात.
उज्जैन, नागपूर, बेळगाव, नाशिक, येथील अनेक संस्थांची कीर्तन विषयीची मानपत्रे त्यांना मिळाली आहेत. कीर्तनासाठी सासवड ग्रामसंस्थांकडून समाज प्रबोधन पुरस्कार त्नांना मिळाला आहे.
दूरदर्शन
- मर्मबंध या टिळक आगरकरांवरील मालिकेत त्यांनी काम केले.
- DD 10 चॅनेलवरील गणेशदर्शन मालिकेत त्यांची कीर्तने झाली. तर चॅनेलवर महिनाभर त्यांची प्रवचने झालीत.
- टीव्हीवरील मुलाखती
- टि. एम. आर. कार्यक्रमात दोनदा
- एम टू, जी टू या कार्यक्रमात एकदा
- साम मराठी वाहिनी वर मधुरा कार्यक्रमात ई tv वरिल परिपूर्ण kitchen मधे
- सूरताल कार्यक्रमात नाट्यसंगीताचे गायनही केले. तर अनेक भक्तीपर कार्यक्रमांना निरुपण केले.
- ई. टीव्ही मराठी वर 2 महिने सलग त्यांची मनोबोधावर प्रवचने झाली.
- स्टार माझा चॅनेलवर पंढरीचे वारी निमित्त महिनाभर कीर्तन झाले.
- संत कथांवर स्वतःच नाटक लिहून श्री. सुधीर मुंगी यांचे मार्गदर्शनाखाली ते नाटक तीन पात्रात बसवून त्याचे प्रयोग "तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल" या नावे अनेक रंगमन्दिरातून आणि मोठ्या उत्सवातूनही केले.
- ई. टीव्ही मराठी वर 5 वर्ष गणेश विसर्जन मिरवणुकीचे निरूपण केले.
- झी मराठी वर चातुर्मासानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण केले.
इतर
- ओवी, भारूड, पोवाडा यांनी युक्त असा लोककला महाराष्ट्राची असाही कार्यक्रम काही विशेष प्रसंगी सादर करतात.
- सावरकरांच्या जीवनावर काव्यगायनाचे कार्यक्रम करतात. त्याच्या ध्वनीफिती जय मृत्युंजय या नावे उपलब्ध आहे.
- 10 संत चरित्रांचा सीडी संच झपाटा कंपनीने केला आहे.
- महाभारतातील व्यक्तीरेखांवरील किर्तनांचा, कीर्तन महाभारत हा 15 कॅसेटचा संच अलुरकर म्युझिक हाऊसनी काढला आहे.
- श्री. गणेश कथेवरील कीर्तनाची audio कॅसेट व्हीनस कंपनीने काढली असून video कॅसेट देखील उपलब्ध आहे.
- तसेच कीर्तनरंग नावाची सीडी ज्यात कीर्तनातील सादरीकरण कसे असते यावरील माहितीचा खजिना आहे ती सीडी श्री. अलुरकर यांनी काढली आहे. ही सीडी आज कीर्तन विद्यालयामध्ये आणि संगीत विद्यालयामध्ये मार्गदर्शक म्हणून वापरली जाते.
- संत नामदेव चित्रपटात त्यांनी ज्ञानदेवांची भूमिका केली आहे.
- हेमंत बॅनर्जी कृत बालगंधर्वावरील माहितीपटात बालगंधर्वांची स्त्रीवेशात व पुरुष वेशातही भूमिका केली. या माहितीपटाला शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला. पुणे सकाळला श्रावणमास लेखमाला लिहिली.
- डीडी 10 वरील लोकराजा शाहू या मालिकेत बालगंधर्वांचे स्त्री वेशात काम केले.
- स्लाईड शोची मदत घेऊन ऐतिहासिक कथा व संतकथा विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय करण्याचे कार्य ते आज करत आहेत.
- तिन्हीसांजा, Made In China, बालगंधर्व या मराठी मराठी चित्रपटातून कीर्तने केली व पार्श्वगायन केले.
- प्रेम वैद्य यांनी निर्माण केलेल्या सावरकरांच्या माहितीपटात भूमिका केली.
- सौ. अंजली कीर्तने यांनी निर्माण केलेल्या, पंडित D V पलुस्करांवरील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लघुपटात पंडित विनायक बुवा पटवर्धन यांची भूमिका केली.
- पाणी वाचवा, बोर शेती, कचरा निर्मूलन अशा सामाजिक विषयांवर कीर्तने केली.
कीर्तन, व्याख्यान यांचे विषय
- वासुदेव बलवंत फडके
- चाफेकर बंधू
- राणी लक्ष्मी
- स्वातंत्र्यवीर सावरकर
- नेताजी सुभाषचंद्र बोस
- भगतसिंग
- आर्य चाणक्य
- श्रीकृष्ण
- वाल्मिकी रामायण
- श्रीमद भागवत कथा
- संत ज्ञानेश्वर
- संत तुकाराम संत एकनाथ
- संत रामदास
- संत जनाबाई
- संत कान्होपात्रा
- संत चोखामेळा
- संत गोरा कुंभार
- संत तुलसीदास
- संत मीराबाई
- संत नामदेव
- संत रोहिदास
- छत्रपती शिवराय
- प्रतापगड
- बाजीप्रभू देशपांडे
- शाहिस्तेखान स्वारी
- आग्र्याहून सुटका
- तानाजी मालुसरे
- राज्याभिषेक
- येसाजी कंक
- छत्रपती संभाजी महाराज
- पेशवाई
- थोरले बाजीराव
- माधवराव पेशवा
- 1857 चे स्वातंत्र्यसमर
- पानिपत युद्ध
- पृथ्वीराज चव्हाण
- महाराणा प्रताप
- राणी सारंधा
- महाभारत कथा
- वीर हनुमान
- भगवान दत्तात्रय
- नाथ पंथ
1921 सदाशिव पेठ, भिकारदास मारुती मंदिर, पुणे 30